ब्रेड व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

▪️दोन आरोपींना अटक;तर दोन आरोपी फरार

अंजनगाव सुर्जी :चिंचोली रहिमापुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापुसतळणी येथील इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश रमेशराव महानकर (32) रा.कापुसतळणी असे हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव असून महानकर यांचा ब्रेड तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे.ते दर्यापूर बाजारात ब्रेड विक्री करत असून त्याच बाजारात अंजनगाव सुर्जी येथील भालदरपुरा रहिवासी जावेद खान हसन खान यांचा सुद्धा ब्रेड विक्रीचा व्यवसाय आहे.व्यवसायामधील मतभेदावरून जावेद खान याने 30 जानेवारी रोजी दर्यापूर येथील आठवडी बाजार आटोपल्यावर खिरगव्हान फाट्याजवळ रात्री 11 ते 12 वाजताच्या सुमारास मुकेश च्या वाहनासमोर आपला ऑटो आडवा लाऊन रस्ता अडविला व चार इसमासह उतरून वाहनातील लोखंडी पाईपने तेरा ब्रेड का धंदा बंद कर, तेरे धंदे के वजह से हमारा धंदा नहीं हो रहा है असा वाद घालून शिवीगाळ करून लोखंडी पाईपच्या सहाय्याने हाता पायावर आणि डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले व घटनास्थळावरून पळ काढला. सदर प्रकरणी रहिमापुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता तक्रार नोंदवून आरोपींवर गुन्हा दाखल केला.नंतर जखमी मुकेशला सातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले आणि तेथून अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशला अचलपूर उपजिल्हा रेफर करण्यात आले.घटनेतील हल्लेखोर चार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आले असून आणखी दोन आरोपींचा तपास रहिमापुर पोलीस घेत आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013550
error: Content is protected !!