
▪️चिमुकल्यांच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने
अंजनगाव सुर्जी :शहारातील आई उषाताई अडगोकर बहुद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित स्टडी सर्कल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन 29 जानेवारी 2025 रोजी उत्साहात पार पडले. या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रदीप देशमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमोद दाळू उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वप्निल कोल्हे, श्रीकांत जुनगरे, अमोल रसे, विनोद हाडोळे उपस्थित होते.
स्टडी सर्कल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी नृत्यकलेच्या माध्यमातून समाजाला संदेश सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान अभ्यासक्रमात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे संचालन संदीप अपाले सर, फुरसुले सर व पूनम वानखडे मॅडम यांनी केले. तर स्टडी सर्कल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुकेश अडगोकर, मुख्याध्यापिका सौ.सीमा अडगोकर, सौ.सोनाली माहुलकर, पूजा नवले, सौ.जया मलिक, खुशी वानखडे, अदिती ढेंगले, सौ.योगिता कळसकर या शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले. तर स्टडी सर्कल इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुकेश अडगोकर यांच्या आभार प्रदर्शनाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






