
✒️ श्रीकांत नाथे अंजनगाव सुर्जी :आपला देश शेती प्रधान देश आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत रासायनिक खताच्या तुलनेत शेतीपूरक सेंद्रिय खताची निर्मिती कमी झाली असल्याने रासायनिक खत दिल्याने जमिनीचे आयुष्य आणि त्यामधून निघणाऱ्या खाद्य उत्पादनामुळे मोठ्या आजारांना आपण आमंत्रण देत आहोत.
प्रत्येक घरातून मोठ्या प्रमाणात निघणारा केरकचरा (नसाडलेले अन्न,भाजीपाल्याचा अतिरिक्त भाग इ.) निघतो आणि तो कचरा आपण गोळा करून नगरपरिषद, महानगरपालिकेच्या घंटागाडी मध्ये टाकतो. ज्यामधे ओला कचरा आणि सुका कचरा असे विभाजन केलेले असते. परंतु सेंद्रिय निर्मिती प्रकल्प दाखवून असे निदर्शनास आहे की, आंधळ्या कारभारामुळे प्रशासन आपण दिलेल्या कर मधून म्हणा की,शासन निधीतून म्हणा करोडो रुपयांनी मग्गंम होतांना दिसत आहेत. समजा एका शेतकऱ्याने आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना प्रत्येकी एक डस्टबिन दिली आणि काही रुपयांमध्ये मिळणाऱ्या डस्टबिनमुळे लाखो रुपयात न मिळणारा कचरा मिळाला तर तोच कचरा (हानिकारक कचरा विलिगिकरण करून) शेतात शोष खड्डा (कंपोस्टिंग) करून त्यामध्ये टाकला त्यामधे गुराढोरांचे शेण, गांडूळ, तर शेतीकरिता विनामूल्य खत व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे वाढत्या आजारांचा प्रादुर्भाव पाहता मोठ-मोठ्या आजारांनाचं आपण पळवून लावणार नाहीतर आपल्याला द्यावा लागणारा कर, शासनाचा निधी, हॉस्पिटल बिल मोठ्या प्रमाणात वाचेल.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






