
✒️श्रीकांत नाथ अंजनगाव सुर्जी :आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत लक्षात असू द्या की 10-20 रुपयांसाठी तुम्हाला,तुमच्या वडिलांना,तुमच्या पत्नीला,तुमच्या मुलांना भर उन्हात काम करावे लागते.जागरूकतेने काम करा आणि आपली फसवणूक टाळा.
गॅस ग्राहकांनी लक्षात ठेवावे
▪️गॅस सिलेंडर भरून घेताना एजन्सी मालकाला ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त भाडे आकरण्याचा अधिकार नसतो. कारण घरपोच डिलिव्हरी चार्जेस आधीच गॅसच्या किमतीमध्ये समावेश असते.
▪️ एखाद्या ग्राहकाने जर स्वतः गॅस सिलेंडर एजन्सीच्या गोडाऊन वर जाऊन गॅस सिलेंडर भरून घेतला तर अतिरिक्त चार्जेस आकारल्या जात नाहीत.तसेच व्यतिरिक्त शुल्क (घरपोच भाडे) देण्याची सुद्धा गरज नाही.
▪️ एजन्सी मालकाचा गॅस गोडाऊन हा आपल्या गावापासून कितीही किलोमीटर अंतरावर असला तरीही तो एजन्सी मालक ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त भाडे आकारू शकत नाही. बरेच एजन्सी मालक किंवा त्यांचे कर्मचारी गोडाऊन व आपल्या गावचे अंतर जास्त आहे असे सांगून खेडे भागातील ग्राहकांची लूट करतात.
▪️ गॅस सिलेंडर भरून घेतल्यावर एजन्सी मालकाकडून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्याकडून बिलाची पावती न विसरता घ्यावी. कारण कोणतीही वस्तू विकत घेतल्यावर त्या वस्तूचे बिल घेणे हा ग्राहकाचा अधिकार आहे.
▪️ कोणत्याही गॅस एजन्सी कडून गॅस सिलेंडर विकत घेतल्यानंतर प्रत्येक ग्राहकाने सिलेंडरचे वजन करून घ्यावे. कोणताही गॅस एजन्सी मालक गॅस सिलेंडरचे वजन करून देण्यास नकार देऊ शकत नाही.तसेच गॅस सिलेंडरचे वजन करून घेणे हा ग्राहकाचा अधिकार आहे.
▪️ गॅस सिलेंडर मधला गॅस काढून घेण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कमी गॅस मिळतो म्हणून आपले नुकसान किंवा फसवणूक टाळण्यासाठी गॅस सिलेंडरचे वजन करून घ्यायला विसरू नका.
गॅस ग्राहकांनी तक्रार कशी करावी
जर आपण इंडियन ऑईल कार्पोरेशन चे ग्राहक असाल 8454955555 या ग्राहक सेवा टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यावर गॅस संबंधित माहिती घेऊ शकता आणि तक्रार सुद्धा करू शकता.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





