
सुरमयी अविष्कार मराठी पाऊल पडती पुढे.. कार्यक्रमाची संगीतमय प्रस्तुस्ती
अमरावती : मनात जिद्द ,चिकाटी व काहीतरी करून दाखविण्याची ऊर्जा असेल तर कुठलेही असाध्य ध्येय साध्य करता येते. आपल्या इच्छाशक्तीला बुद्धिमत्ता, कुशल अभिक्षमता, अभ्यासुवृत्ती व परिश्रमाची जोड देऊन नवे क्षितिजे गाठता येतात. अशीच आकाशाला गवसणी घालण्यासाठी एक उत्तुंग भरारी अमरावतीच्या कु.सारजा शशिकांत डवरे हिने घेतली आहे. नवसारी- व्हिएमव्ही भागातील कु. सारजा शशिकांत डवरे हिने इंडियन एअर फोर्स तर्फे घेण्यात आलेल्या एएफसीएटी- परीक्षेमध्ये पहिली रँक मिळवून मुलींमध्ये पहिली मराठी फायटर पायलट होण्याचा मान मिळविला आहे. तिच्या या उत्युंग भरारी मुळे अमरावतीचा बहुमान उंचावला असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या नेत्रादीपक कामगिरी बद्दल सत्कार करण्याला घेऊन रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वामी विवेकानंद थीम पार्क विलास कॉलनी जवळ कठोरा नाका अमरावती येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई संजय खोडके व माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांची उपस्थिती राहणार आहे. सोबतच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मराठी पाऊल पडती पुढे” हा मराठी -हिंदी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर होणार असून यामध्ये सुरमयी अविष्कार स्वराध्या संगीत संच अमरावतीच्या कलाकारांच्या वतीने संगीतमय प्रस्तुती देण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत डवरे मित्र परिवार व शिव संकल्प प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






