भारतीय सैन्यदलातून सेवा निवृत्त कर्मचाऱ्याचा विठ्ठल नगर येथे सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंजनगाव सुर्जी :शहारातील सुनील रूपराव जवंजाळ यांनी भारतीय सैन्यदलात २० वर्षे ०७ महिने देशसेवा केली आहे.ते सैन्यदलातून निवृत्त झाले.त्यांचा निवृत्त समारंभ पॅरामिलिटरी माजी सैनिक संघटना अंजनगाव सुर्जी यांनी दि.०८ फेब्रुवारी २०२५ रोजी विठ्ठल नगर येथे आयोजित केला होता. गावच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा अभिमान असल्याने त्याचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यायला हवा या हेतूने तसेच सेवा निवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त होईल, म्हणून त्यांचा सन्मान समारंभावेळी उत्तमराव तायडे यांनी आपल्या भाषणातून म्हटले.तर कार्यक्रमाचे संचालन निलेश ढगे यांनी केले.
त्यांच्या सेवा निवृत्त समारंभाला यावेळी माजी आमदार रमेश बुंदीले, माजी नगराध्यक्ष ऍड. कमलकांत लाडोळे, भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे,पत्रकार संघटनेचे शिवदास मते,गजानन चांदूरकर, श्रीकांत नाथे,पॅरामिलिटरी माजी सैनिक संघटना अंजनगाव सुर्जीचे अध्यक्ष राजेश अस्वार,उपाध्यक्ष दीपक धानोरकर,सचिव पी. व्ही. काकड,कोषाध्यक्ष महादेव नेमाडे,अनिल येऊल,सुभाष भास्कर,सुरेश वारके,उत्तम येऊल गोपाल अस्वार,मोहन काळमेघ,नरेश थोरात,प्रभाकर भावे,रतन ताडे,गजानन नागे,गोविंद रेखाते,गणेश गुजर,राजेंद्र उके,राजू चिंचाळकर तसेच विशाखा संघटनेच्या महिला व गावकऱ्यांनी यावेळी माजी सैनिक सुनील जवंजाळ यांचे भरभरून कौतुक केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013549
error: Content is protected !!