
श्रीकांत नाथे
अचलपूर : तालुक्यातील नायगाव बोर्डी येथील धम्म कुटी परिसरातील सभागृह येथे दोन दिवसीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षक शिबीर व त्यागमुर्ती माता रमाई यांच्या १२७ व्या जयंती निमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समता सैनिक दल, दीक्षा भूमी अचलपूर या संघटनेचे प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सतिष इंगोले यांनी सांगितले की, जिच्या हाती, समता सैनिक दलाची दोरी ,ति,समाजाचा व कुटुंबाचा उध्दार करी, आम्ही जगण्यासाठी खातो, की खाण्यासाठी जगतो हा गंभीर प्रश्न आहे. तेव्हा समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाच्या फोडण्याचे काम समता सैनिक दलाचे आहे, असे मार्मिक मार्गदर्शन यावेळी इंगोले यांनी केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन व पूजनीय आर्याजी संघरक्षिता यांनी भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिराचे प्रशिक्षक म्हणून मार्शल सुनील तायडे,प्रेम खारोंडे,सिध्दार्थ सावळे उपस्थित होते त्यांनी शिल,ध्येय,व शौर्य या बद्दल प्रशिक्षण दिले.या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून मनोज मेळे यांनी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे उपस्थितीत होते. या प्रशिक्षण शिबिराला घोडगांव,कविठा बुद्रुक,बोरगाव पेठ,मेघनाथपूर, राजणा,पथ्रोट,माधान,काजळी देवूळवाडा,आसेगाव पुर्णा, गोरखेडा,कौंडवर्धा,सांगली,साखरी येथील समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दांडगे ताई यांनी केले व आभार प्रदर्शन इंगळे ताई यांनी केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





