अकोला : जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला सॉफ्ट ड्रिंक पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले याला खामगाव-शेगाव मार्गावर खासगी लक्झरी बसमध्ये प्रवास करीत असताना अटक केली. सदर आरोपी हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन ९ सप्टेंबर २०२४ रोजी यातील आरोपी व त्याच्या साथीदारांनी मिळून फिर्यादीला सॉफ्ट ड्रिंक पिण्यास सांगितले. सदर सॉफ्ट ड्रिंकमध्ये बियर मिळविली. फिर्यादी मुलगी नशेत असताना आळीपाळीने तिच्यावर जबरी संभोग केला. याबाबत कोठेही वाच्छता केल्यास तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली, अशा फिर्यादीrवरून गेल्या २८ सप्टेंबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन जुने शहर येथे कलम ६४ (२) (च), ६५, ७०, ३५१ (१), (२) भा.न्या.सं. सहकलम ४ (२), ५ (जी), (पी), ६, १२ पोक्सो अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यातील फरार सराईत आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले रा. हरिहरपेठ दसेरा नगर अकोला हा घटनेपासून फरार होता. एलसीबीच्या पथकाने खात्रीशीर माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा मध्यप्रदेश उज्जैन येथून खासगी लक्झरीने निघाला असल्याची माहितीr मिळाल्याने खामगाव-शेगावदरम्यान लक्झरी अडवून चेक केली असता, आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले रा. हरिहरपेठ दसेरा नगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी जुने शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
या पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
सराईत गुन्हेगार आरोपी प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले रा. हरिहरपेठ दसेरा नगर याच्या विरूध्द यापूर्वी जुने शहर, पातूर, डाबकी रोड, सिटी कोतवाली या पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कामगिरी!
ही कारवाई एसपी बच्चन सिंह, एएसपी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय शंकर शेळके, एपीआय विजय चव्हाण, पीएसआय गोपाल जाधव, माजीद खान पठाण, पो. अं. रवींद्र खंडारे, खुशाल नेमाडे, सुलतान पठाण, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, राहुल गायकवाड, आशिष आमले, अक्षय बोबडे यांनी केली.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com