Washim: संधीचे सोने करा, हि मोठी जबाबदारी आपल्यावर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

मानोरा  :- मृद व जलसंधारण विभागातंर्गत  आयोजित जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) नियुक्ती पत्राचा वितरण समारंभ मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडला. यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी विभागातील नवनियुक्त अधिकाऱ्यांशी संवाद साधला, लाखो तरुणांमधून केवळ तुमच्यासारख्या 601 उमेदवारांना या विभागात काम करण्याची संधी मिळाली आहे. सरकार आणि मुख्यमंत्री यांची आपल्या विभागाकडून मोठी अपेक्षा आहे. प्रत्यक्ष जनतेची, शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी या विभागात निवड झाल्यामुळे आपल्याला मिळाली आहे, अशा भावना व्यक्त करून त्यांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

अभियानात मिळालेला लोकसहभाग हा या अभियानाचे यश

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून राज्यात सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाने वेगळी क्रांती घडवून आणली आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश असून या अभियानात मिळालेला लोकसहभाग हा या अभियानाचे यश आहे. नवनियुक्त अधिकाऱ्यांमुळे जलसंधारण विभागातील कामांना अधिक गती मिळेल आणि लवकरच आपण महाराष्ट्राला टँकर मुक्त करू असा संकल्प या निमित्ताने त्यांनी केला. आपल्या जलसंधारण विभागाने अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्याच पद्धतीने या नवनियुक्त अधिकाऱ्यांनी देखील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले. राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसभागातून झालेल्या कामे ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमुळे जलयुक्त शिवार अभियान देशात आदर्शवत ठरले

पाणी नाही, मृदा नाही तर त्याला भविष्य नाही असे सांगून राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी जलसंधारण विभागामध्ये नवनियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी, काम करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रकाश खपले यांच्यासह नवनियुक्त अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013549
error: Content is protected !!