Risod Bullion Case: रिसोड सराफा व्यवसायांनी सलग दुसऱ्या दिवशी ठेवला व्यापार बंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सराफा व्यापारांचे तहसीलदार, ठाणेदार,आमदार यांना निवेदन

रिसोड  : गेली काही दिवसापूर्वी घडलेल्या चोरीच्या तपास कामी रिसोड येथील सराफा व्यावसायिक सुवर्णकारांना नाहकच लक्ष करून त्यांना त्रास देण्यात येत आहे सदर घटनेचा निषेध म्हणून रिसोड सराफा व्यवसायांनी सलग दुसऱ्या दिवशीही आपला सराफा व्यवसाय बंद ठेवून सदर प्रकारचा निषेध केला आहे दिनांक 13 फेब्रुवारी रोजी  सराफा व सुवर्णकार असोसिएशन संघटनेच्या वतीने रिसोड तहसीलदार ठाणेदार तथा विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांना निवेदन सादर करून सदर प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसापुर्वी चोरीच्या घटना घडल्या असुन त्यामध्ये हिंगोली येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काही चोरांना पकडले असुन त्यामध्ये चोराकडून चौकशी करत असतांना अनेक चोरट्यांनी सदर गुन्ह्यात कारागीर व व्यापारी यांचा असल्या घटनेत कुठलेही संबंध नसुन चोरांच्या सांगण्यावरुन कारागीरांना व व्यापारी यांना असल्या प्रकरणात गवण्यात येत असुन अश्या कारागिरांचे व व्यापरांचे असल्या कुठल्याही चोरट्यांचे व्यवहारीक संबंध नसुन ते बोट दाखवतात.

पोलीस प्रशासन कुठलीही शहानिशा न करता सदर कारागिरांना व व्यापारांना धरुन आणुन आरोपीची वागणुक देतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पुर्ण चौकशी शहानिशाच करुन रिसोड येथील कारागीर व व्यापारी यांना न्याय द्यावा जेणे करुन कुठल्याही सराफा व सुर्णकार कारागीर व्यापारी यांना त्रास होणार नाही हिच अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून रिसोड सराफ व सुवर्णकार असोशिएन यांच्याकडून अशी मागणी करण्यात येत आहे. याचा विचार करुनच यापुढेही सुध्दा पुर्ण शहानिशा करुनच पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे सदर घटनेच्या निषेधार्थ रिसोड सराफा सुवर्णकार संघटनेच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रिसोड येथील सर्व सुवर्ण सराफा कारागीर व व्यापारी यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवुन सदर प्रकरणाचा निषेध नोंदविला. निवेदन देताना सराफा व सुवर्णकार असोसिएशन संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सदर प्रकार अत्यंत गंभीर असून विनाकारण सराफा व्यवसायांना त्रास देणे अत्यंत चुकीचे आहे चोरांच्या बोलण्यावरून व त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आपली चौकशी न करता स्वतः याबाबत शहनिशा करूनच तपास करावा. सदर प्रकार प्रकरणी विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडू.
– भावना ताइ गवळी, आमदार विधान परिषद

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Our Visitor

0 5 0 3 2 0
Users Today : 8
Users This Month : 332
Total Users : 50320
error: Content is protected !!