जन्म जात प्रमाणपत्र घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना घेतले ताब्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी श्रीकांत नाथे

अंजनगाव सुर्जी :अंजनगाव सुर्जी येथे बांगलादेशी रोहिंग्या बाबतीत नवीन माहिती समोर आली आहे.अंजनगाव सुर्जी पोलिसांनी बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधी विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंजनगाव सुर्जी पोलिसांनी बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधित भारतीय न्याय संहिता (बिएनएस) 2023 कलम अंतर्गत 318(2), 336(2),336 (3), 337, 340(2) अन्वये नजराना बी साहेब ख,सैय्यद करामत अली सै.नुर, शेख नजीर शेख रशीद,रशीद खान अयान खान, मालन बी शेख रऊफ या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मालेगाव, अकोला, मुर्तीजापुर, अमरावती येथे बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधित एफआयआर दाखल झाले असून खोटे, फसव्या दस्तावेजचे 100 अर्ज प्रकरण पुरावे पोलिसांना दिले असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.तर बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधित अंजनगाव सुर्जी पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013549
error: Content is protected !!