▪️शांताबाई श्रीवास्तव इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
श्रीकांत नाथे प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : शहरातील शांताबाई श्रीवास्तव इंग्लिश स्कूल अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी महादेवराव ठाकरे मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्या दरम्यान चिमुकल्यांनी मोबाईलमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम याविषयी विशेष आकर्षण सादरीकरणाने तसेच भारतीय संस्कृतीवर आधारित नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तर या कार्यक्रमाला नवनिर्वाचित आ.गजानन लवटे हे अध्यक्षस्थानी लाभले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे उपस्थित होते.
तर लहान मुलांच्या संदेशपूर्ण सादरीकरणातून समाजात वाव मिळावा आणि त्यांचा उत्साह आणि आनंद वाढवा यासाठी महेंद्र दिपटे, डॉ.विलास कविटकर, विजय बाळे, विक्रम पाठक, रवींद्र मडघे, पप्पू लांडे, परमेश्वर श्रीवास्तव प्रियंकाताई मालठाने, शिलाताई सगणे, हेमलताताई लेंधे, विद्याताई घडेकार या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून लहान मुलांचा उत्साह आणखी द्विगुणित केला.समवेत शांताबाई श्रीवास्तव इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमित श्रीवास्तव,मुख्याध्यापिका सविता राऊत आणि शिक्षक वृंद यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून सरावासाठी मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com