श्रीकांत नाथे
अंजनगाव सुर्जी :शहारातील सुर्जी भागातील मलकापूर रोडवरील गजानन महाराज मंदिर येथे गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवास प्रारंभ झाला आहे.श्री संत गजानन महाराज यांचा 947 वा प्रगट दिन महोत्सव निमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे श्रवण भाविकांना करता येणार आहे.
या आठवडाभराच्या प्रगट दिन महोत्सव दरम्यान भाविक भक्तांना वाणीभूषण ह.भ.प. गोपल महाराज भुस्कट (आळंदीकर) व ह.भ.प. गजानन महाराज गोरडे पारायण व्यासपीठ नेतृत्व यांच्या मधुर वाणीतून प्रवचन कीर्तनाचा आस्वाद पंचक्रोशीतील भक्तमंडळींना घेता येणार आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 93