श्रीकांत नाथे अंजनगाव सुर्जी : शहारातील चर्मकार समाजातील नागरिकांनी व समाजातील बंधू-भगिनींनी संत गुरू रविदास महाराज यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.तसेच शासनाचे निर्देश आदेशान्वये दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी अंजनगाव सुर्जी शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये संत गुरू रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तहसील कार्यालयात जयंती थाटात
तहसीलदार पुष्पा सोळंके (दाबेराव) यांनी संत गुरू रविदास महाराज यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार तसेच अधिकारी कर्मचारी यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि पेढ्याच्या गोडव्याने जयंती उत्सव थाटात पार पडला.
न.प.कार्यालयात जयंती दिनी करण्यात आले प्रतिमेचे पूजन
नगरपरिषद कार्यालय येथे प्रशासकीय अधिकारी गोविंद त्रिपुरारी,सुनील उमक,अनिल टांक समवेत कार्यालयातील संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावेळी अभिवादन केले.
विभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
विभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय जि.प. ल.पा.उपविभाग,अंजनगाव सुर्जी येथे गुरू रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच पेढे वाटून उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी जलसंधारण अधिकारी चंद्रशेखर गोळे,वरिष्ठ सहाय्यक अनिल ठाकरे,कनिष्ठ सहाय्यक रवींद्र नाथे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com