परभणी :- नांदेड येथील हायवा टिप्परमध्ये वाळू भरुन त्याची साठवणूक पालम तालुक्यातील बनवस शिवारात केली जात आहे, अशी माहिती मिळाल्यावर स्थागुशाच्या पथकाने शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास बनवस शिवारात कारवाई करत तीन हायवा टिप्पर ताब्यात घेतले. सदर कारवाईमध्ये ४६ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी स्थानिक गुन्हे शाखेची बनवस शिवारात कारवाई
स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पांडुरंग भारती, सपोनि. दोनकलवार, पोउपनि. परिहार, पोलीस अंमलदार लक्ष्मण कांगणे, राहूल परसोडे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, दुधाटे, हनुमान ढगे, भदर्गे, क्षिरसागर, पोले यांच्या पथकाने कारवाई केली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना नांदेड येथील वाहनामध्ये अवैधरित्या वाळू आणून त्याची बनवस शिवारात साठवणूक करुन केल्या जात आहे, अशी माहिती मिळाली होती.या माहितीवरुन सापळा लावत पोलिसांनी तीन हायवा टिप्पर ताब्यात घेतले आहेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com