मानोरा :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत राज्य शासनाने निकच्या सहकार्याने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी रेशन कार्ड मधील सदस्यांच्या सोयीसाठी आता घरबसल्या काही मिनिटातच अँड्राईड मोबाईलद्वारे इ – केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आधार क्रमांक मोबाईल यांच्याशी लिंक असणे आवश्यक आहे. शासनाने ३१ मार्च पर्यंत ई – केवायसीची मुदत वाढविल्याने सर्व लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
ई – केवायसीची मुदत वाढविल्याने सर्व लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे आवाहन
यासाठी प्ले स्टोअरवरून जाऊन दोन मेरा ई – केवायसी अँप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अँपवरून राज्य महाराष्ट्र असे निवडावे, आधार क्रमांक टाकून आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करावे. कॅप्चर दिलेल्या कोडची नोंद करावी, त्यानंतर चेहऱ्याद्वारे पडताळणी करावी. स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करावे, दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बँक कॅमेरा वापरावा, स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्यांची उघडझाप करावे, यशस्वी पडताळणी झाल्यास सत्यापण पूर्ण लाभार्थ्यांची माहिती रास्त भाव दुकानाच्या मशीनवर दिसणार आहे.
अँपमध्ये ई – वायसी स्टेटस वाय दिसत असेल तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे समजावे
याची खात्री करण्यासाठी अँपमध्ये ई – वायसी स्टेटस वाय दिसत असेल तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे समजावे. शासनाने ई – केवायसी ची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली असल्याने रास्त भाव दुकानदारांनी शिधापत्रिका धारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई – केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना अन्न धान्यापासून वंचित राहावे लागणार नाही. असे निर्देश पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com