बेवारस श्वानाचा ८७० ग्रॅमचा ट्युमर शस्त्रक्रियेने काढला

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : छातीला लटकलेल्या मांसाच्या गोळ्याने त्या मादी श्वानाला उठताही येत नव्हते आणि धडपणे बसताही येत नव्हते. तिच्या त्रासाने कळवळणाऱ्या प्राणिप्रेमींनी वसा संस्थेच्या अॅनिमल्स रेस्क्यू हेल्पलाइनला कळविले. या संस्थेने चिकाटीने या मादी श्वानाला पकडून वसा अॅनिमल्स रेस्क्यू सेंटरला भरती करून घेतले. छातीला लटकलेल्या मांसाच्या गोळ्याचे वजन ८७० ग्रॅम होते. तो गोळा सर्जरी करून काढण्यात आला आहे.

प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या अॅनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादीश्वानाला रेस्क्यू केले.

पहिल्यांदा या श्वानाने हुलकावणी दिली. दुसऱ्यांदा टीम पूर्ण साहित्यनिशी सराफा बाजारात दाखल झाली आणि लगेच त्या मादी श्वानाला रेस्क्यू करत मंगलधाम परिसरातील श्री गोरक्षण व्हेटरनरी हॉस्पिटलला तपासणीसाठी दाखल केले.

तेथे डॉ. सुमित वैद्य यांनी त्या मादी श्वानांची तपासणी करीत तिला वसा अॅनिमल्स रेस्क्यू सेंटरला भरती करून घेतले. तिच्यावर उपचार करुन अडीच तासांपर्यंत शस्त्रक्रिया केली. त्यानंतर श्वानाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. पुढील आठवड्यात तिच्यावर केमोथेरपी करण्यात येईल.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!