
अमरावती जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिकस्त झालेल्या वर्गखोल्याची प्रशासनाने तातडीने देखभाल दुरुस्ती करून या वर्गखोल्यांचा लूक बदलला आहे.
लोकसभा मतदारसंघातील २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. यासाठी जिल्हाभरात १९८३ मतदान केंद्रे निश्चित केली होती. ही मतदान केंद्रे जिल्हा परिषद शाळेत कार्यान्वित होती. मात्र, केंद्र असलेल्या काही शाळेतील वर्गखोल्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासन दखल घेते. ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील जि.प.च्या ज्या शाळा मतदान केंद्र म्हणून निवडल्या होत्या.अशा शाळांची पाहणी करण्यात आली. ज्या शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी करणे आवश्यक आहे, त्यांची रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम जिल्ह्यात अनेक ठिकाणी तातडीने करण्यात आले. विशेष म्हणजे या शिकस्त वर्गखोल्या गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित होत्या. शाळांच्या परिसरातदेखील कोणीच फिरकत नव्हते. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने या शाळांची प्रशासनाला आठवण झाली आहे.
ज्या शाळांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र निश्चित केले होते. या शाळांची वरिष्ठांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ज्या वर्गखोल्यांमध्ये केंद्र होते, अशा वर्गखोल्या मात्र एक- दोन ठिकाणी होत्या. या वर्गखोल्यांची दुरुस्ती, तसेच निकडीची कामे मतदानापूर्वी केली आहेत. – राजेश लाहोरे, (उपअभियंता, बांधकाम विभाग, जि.प.)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






