धावत्या रेल्वे गाडीतून पर्स चोरणारा ट्रॅकमॅन जेरबंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बडनेरा : धावत्या रेल्वे गाडीमधून पर्स चोरी करणारा आरोपी बडनेरा रेल्वे पोलिसांनी जेरबंद केला. तो ट्रॅकमॅन म्हणून रेल्वेत कामाला आहे. त्याच्याकडून विविध घटनांमधील साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बडनेरा रेल्वे पोलिसांनी एक पथक स्थापन करून आरोपीबाबत माहिती काढण्याचे काम सुरू केले होते. त्या अनुषंगाने आरोपी संतोष रमेश जगधने (४०, रा. रेल्वे कॉटर, बडनेरा) यास अटक करून गुन्ह्यामधील दोन मोबाईल आणि सहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र असा ऐकून साडेपाच लाखांचा ऐवज जप्त केला. रेल्वे पोलिस अधीक्षक प्रियंका नारनवरे, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (अकोला) संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी उमेश मुंढे, सागर खंडारे, प्रसन्नजित कुर्वे, पोलीस शिपाई नीलेश अघम, आरपीएफ शैलेश धर्मे, रितेश चौके यांनी केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013545
error: Content is protected !!