
मेळघाटच्या आरोग्य विभागात चाललंय काय? फौजदारीची मागणी
परतवाडा : मेळघाटातील आरोग्य विभागात बंद जनरेटर सुरू असल्याचे दाखवून त्यावर लाखो रुपयांची डिझेलची बिले काढण्यात आली. आता ती बिलेसुद्धा अस्सल नव्हे, तर परस्पर छापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यामुळे संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे.
चिखलदरा तालुक्यातील सलोना, सेमाडोह, काटकुंभ व हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात जनरेटरसाठी डिझेल बिले बनावट तयार करून शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकांसाठी डिझेल खरेदीपोटी पेट्रोल पंप संचालकाची जवळपास २६ लाखांची थकबाकी आरोग्य विभागाकडे आहे.
बनावट बिले छापली ?
जनरेटर बंद असल्याचे दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पुढे आले होते. त्यानंतरही डिझेल वापराची बिले सादर करताना धारणी मार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या नावे बनावट पावत्या छापून वापरण्यात आल्या.
आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारz24news.inने सप्रमाण प्रकाशित केल्यानुसार रुग्णवाहिका खासगी कामासाठी वापरल्या जातात आणि बंद जनरेटर सुरू असल्याचे दाखवून त्यावर बनावट डिझेल खरेदीची बिले सादर करण्यात आली.
पेट्रोल पंपाची काही बनावट बिल सादर करून त्यावर देयके काढल्याची माहिती आली. प्रत्यक्षात काय प्रकार आहे, याची चौकशी आपण करीत आहोत. माझीच ३६ लाखांची थकबाकी आहे.
उज्ज्वल डांगरे, पेट्रोल पंप संचालक
प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल व शासकीय रक्कम वसूल केली जाईल.
सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





