अमरावती : नॅशनल हेराल्ड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करीत भाजयुमोने काँग्रेस भवनापुढे निदर्शने दिली. भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी हे जामिनावर बाहेर आहेत. या दोघांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी सोमवारी अमरावती तसेच यापूर्वी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नांदेड, लातूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यानुसार यावेळी राहुल गांधी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. यादरम्यान पदाधिकाऱ्यांचा पोलिसांसोबत वादही झाला. प्रदेश महामंत्री बादल कुलकर्णी, शहर जिल्हाध्यक्ष कौशिक अग्रवाल, ग्रामीण अध्यक्ष अजिंक्य वानखडे, प्रदेश सचिव प्रणित सोनी, तुषार चौधरी, नीलेश पवार, करण धोटे, नितीन गुजर, प्रवीण रुद्रकार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





