जिवंत सात-बारा मोहीम : तलाठ्यांद्वारा झाला गावनिहाय सर्व्हे, आता फेरफारची कामे प्रक्रियेत
अमरावती: सातबारावर मृत खातेदारांची नावे कायम असल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहे. यासाठी जिवंत सातबाराची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या गावनिहाय सर्व्हेत १० हजारांवर मृत शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी आता फेरफार प्रक्रिया सुरू झाल्याने मृतांच्या जागी वारसांची नावे चढणार आहेत.
शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ‘जिवंत’ सातबारा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांद्वारा गावनिहाय सर्व्हे करण्यात आला.
यामध्ये सातबारावरील ९६१८ खातेदार मृत असल्याचे निदर्शनात आले आहे. या मृतांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार मिळावेत, यासाठी ‘जिवंत सातबारा’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांनी सांगितले.
वेळ अन् पैशाची बचत कामेही होतात झटपट
या मोहिमेमूळे मृत खातेदारांच्या वारसाला फेरफारसाठी लागणारा वेळ व पैशाची बचत होत आहे. कमी अवधीत हक्काची शेतजमीन वारसाचे नावे होत असल्याने मोहीं कल्याणकारी ठरत आहे.
मृत खातेदारांची तालुकानिहाय संख्या तलाठ्यांद्वारा करण्यात आलेल्या पाहणीमध्ये ९६१८ खातेदार मृत आढळून आले आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक १६९८, भातकुली १६०१, धारणी १०४१, चांदूरबाजार २६६, दर्यापूर ८४६, अमरावती ७१५, अंजनगाव ७८६, अचलपूर ६६२, धामणगाव ३६३, नांदगाव ३०६, चांदूर रेल्वेचे २०६, तिवसा २४६, वरुड १२१ व मोर्शी तालुक्यात ६२ खातेदार मृत असाल्याचे सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे.
वारसांना मिळणार जमिनीचे मालकी हक्क
वारस नोंदीसाठी दिरंगाई होत असल्याने मृत शेतकऱ्यांच्या नावे जमिनी व सातबारा राहतो. परिणामी, वारसांना मालकी हक्क मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकरणात जिवंत सातबारा मोहीम उपलब्धी ठरणारी असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियात यां नीसांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





