विद्यार्थ्याने चक्क शाळेत आणली छर्राची एअरगन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉक्टर वडिलांविरुद्ध गुन्हा, अमरनगर परिसरातील घटनेने खळबळ

 

अमरावती : शाळेच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सातव्या इयत्तेतील अल्पवयीन विद्यार्थी शाळेत त्याच्या बॅगमध्ये एअरगन घेऊन पोहोचला. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकांनी गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी एअरगन ताब्यात घेऊन विद्यार्थ्याच्या डॉक्टर वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला. २१ एप्रिल रोजी दुपारी शहरातील महेंद्र कॉलनी स्थित अमरनगर येथील शाळेत ही घटना घडली.

सोमवारी दुपारी १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत शेवटचा पेपर दिल्यानंतर तो पेन, कंपाससारख्या गोष्टी ठेवत असताना एका विद्यार्थ्याला एअरगन बॅगमध्ये दृष्टीस पडली. ही माहिती त्याने वर्गशिक्षकांना दिली. शिक्षकाने बॅगमध्ये एअर गन असल्याची खात्री करून मुख्याध्यापक सुशील सोनटक्के यांना सांगितले. त्यांनी गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून एअरगन ताब्यात घेतली.

 

मुंबईहून एक हजार रुपयांमध्ये घेतली विकत एअर गन बाळगणाऱ्या मुलाचे वडील डॉ. मुजीब अली खान यांनाही पोलिस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले. ही एअरगन चार वर्षांपूर्वी मुंबईहून एक हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती. त्यावेळी ते धारणीमध्ये वैद्यकीय सेवा देत होते. तेथे पुढ्यात येणाऱ्या वन्यप्राण्यांना पळविण्यासाठी त्याचा वापर झाला. अमरावतीला परतल्यानंतर ती एअरगन एक खेळणे म्हणून घरात पडून होते. मुलाने चुकून ती स्कूल बॅगमध्ये ठेवली आणि शाळेत आणली, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी आर्म्स अॅक्ट अन्वये निवेदनाची नोंद करून पोलिसांनी फौजदारी खटला नोंदविला. या प्रकरणाची चौकशी होत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013541
error: Content is protected !!