महसूल विभागाच्या पथकांची कारवाई
मोर्शी : ओव्हरलोड अवैधरीत्या गौणखनिज वाळूची तस्करी करणाऱ्या ९ ट्रक महसूल विभागाच्या पथकाने मौजे उमरखेड येथे ही कार्यवाही केली आहे. सोमवार २१ एप्रिल रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातून मोर्शी तालुक्यातील उमरखेड मार्गाने विना रायल्टी अवैधरीत्या गौणखनिज वाळू वाहतुक करणारे ९ ट्रक महसूल विभागाने जप्त करून मोर्शी पोलिस ठाण्यात जमा केले असून, सदर प्रकारणात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैधरीत्या वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मध्य प्रदेशातून ओव्हरलोड ट्रक भरून अवैधरीत्या वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सोमवारी रात्री ११:३० वाजताचे सुमारास रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वातील पथक, मोर्शीचे तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी शिरखेड, पोलिस स्टेशन मोर्शी व बेनोडा यांनी अवैधरीत्या ओव्हरलोड वाळूने भरलेले ९ ट्रक मध्य प्रदेश येथून वरुड बेनोडा मोर्शी मार्गे जात असताना, मोर्शीपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरखेड येथे ट्रक क्र एमएच २७ डी टी ५१६६, एम एच २७ बी एक्स ३६६३, एमएच २७ बीएक्स ६०६०, एम एच २७ डी टी ९४९८, एम एस २७डीएक्स ९४९९, एम एच २७डीटी ०८१७, एम एच २७ डी. टी ७८२२, एमएच २७ बीएक्स ५१११, एम एच २७ डीटी ४५५५ मध्ये जवळपास ६० ब्रास रेती भरलेले ट्रक पकडण्यात येऊन कार्यवाही करण्यात आली. वाहनातील रेतीचे अचूक मोजमाप करण्यासाठी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मोर्शी यांना पत्र देऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





