दर्यापूर : शहरातील जयस्तंभ चौक व सहकारनगर येथे पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री दोन ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली असता, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखू आढळून आला. या दोन्ही कारवायांमध्ये आठ लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एक आरोपीला अटक करण्यात आली, तर एक आरोपी पसार असल्याची माहिती परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक शिवम विसापुरे यांनी दिली.
पोलिस सूत्रांनुसार, गंगाधर विनायक घाटे (रा. सहकारनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इम्रान शाह हारून शाह (रा. कच्छीपुरा, जयस्तंभ चौक) हा पसार झाला. शाह व घाटे यांच्या घरी, गोडाऊनमध्ये गुटखा, पानमसाला व तंबाखू साठवून ठेवला असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शिवम विसापुरे, सहायक निरीक्षक अभय चौथनकर व मनीष दुबे, उपनिरीक्षक हरिहर गोरे, विशाल दांदळे, गजानन नागे आदींनी केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





