चांदूर रेल्वेत ज्वारी खरेदीला प्रारंभ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चांदूर रेल्वे : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५ मे रोजी खासगी व्यापाऱ्यांच्या वतीने ज्वारी खरेदीचा प्रारंभ माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यापारी सचिन मोदी यांनी प्रारंभाची सर्वाधिक २५५१ रुपये बोली लावून ज्वारी खरेदी केली. राजाभाऊ फरकाडे (रा. मांडवा) यांनी सर्वप्रथम ज्वारी विक्री केली. वीरेंद्र जगताप व बाजार समिती सभापती गणेश आरेकर यांनी शाल-श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले. वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. सोयाबीन, चणा, तूर, उडीद, मूग व इतर शेतमालाला बाजार समितीच्या आवारात चांगले भाव मिळत असल्यामुळे शेतमाल विक्रीकरिता बाजार समितीच्या आवारावर आणावा, असे आवाहन आरेकर यांनी केले. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती रवींद्र देशमुख (जाधव), संचालक राजेंद्र राजनेकर, प्रभाकरराव वाघ, रामेश्वर वानखडे, रावसाहेब शेळके, मंगेश धावडे, अतुल चांडक, वर्षा वाघ, पूजा देशमुख, वसंता गाढवे, तेजस भेंडे, आशुतोष गुल्हाने, हरिभाऊ गवई, प्रशांत कोल्हे, सुभाष अग्रवाल, शामसुंदर पनपालिया, सुरेश जाधव तसेच बाजार समितीचे व्यापारी, अडते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013539
error: Content is protected !!