नांदगाव पेठ : शहरातील सय्यदपुरा नांदगाव पेठ येथील रहिवासी ऑटोरिक्षाचालक शेख जहीर शेख रशीद (३८) यांचा मंगळवारी उकडी शिवारातील शेताच्या धुन्ऱ्यावरील हिवराच्या झाडाला गळफास घेतलेला स्थितीत मृतदेह आढळला. तो कुजलेल्या अवस्थेत होता.
याप्रकरणी मृताचा धाकटा भाऊ शेख तन्वीर शेख रशीद यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या जबाबानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रविवारी शेख जहीर घराबाहेर पडले होते. मात्र, दोन दिवस झाले तरीदेखील घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, मंगळवारी एका शेतकऱ्याला मृतदेह आढळून आला. त्याने नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटना उघडकीस आली. पुढील तपास नांदगाव पेठ पोलिस करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 102





