सहा गुरे दगावली, २० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
मोर्शी (अमरावती): तीन वाहनांतगोवंशांना कोंबून व दोरखंडाने एकावर एक बांधून कत्तलीसाठी नेत असताना मोर्शी पोलिसांनी ती वाहने ताब्यात घेऊन ३५ गोवंशाची सुटका केली. वाहनासह एकूण २० लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ७ मे रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही कारवाई केली. पोलिस सूत्रांनुसार, एमपीतून अवैधरीत्या जनावरे आणून ती नेण्याचा गोरखधंदा दिवसेंदिवस वाढत चालला
आहे. बुधवारी एमएच. ३१, एक्स. ४१५२ क्रमांकाच्या वाहनातून १२ जनावरे, एमएच. ४३, डी. २९२९ क्रमांकाच्या वाहनातून नऊ जनावरे आणि विना क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून १४ जनावरे अशी एकूण ३५ जनावरे वाहून नेली जात होती. तरोडा येथील झेडपी
शाळेसमोर तीनही वाहनांना मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामधील सहा गोवंश मृत अवस्थेत आढळले. सर्व जिवंत गोवंशाची पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून तपासणी करून येरला येथील गोरक्षण संस्थेत दाखल केले. सहा मृत गोवंशांचा पंचनामा केला. या प्रकरणी वाहन चालकांविरुद्ध गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, एसडीपीओ संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक विशाल रोकडे, आकाश शिवणकर, तुषार चव्हाण, डीबी स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल, स्वप्नील बायस्कर, छत्रपती करपते यांनी ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





