विविध क्षेत्रातील मान्यवरांद्वारा स्तुतीसुमने
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या रूपाने अमरावतीचे नाव देशात गौरविले जात आहे, ही प्रत्येक अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले हे असामान्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या राहणीमानात कुठलाही बडेजाव नाही, सर्वोच्च पदावर असतानाही शेवटच्या माणसाचा विचार हा त्यांच्या ठायी आहे. त्यांच्याकडे भेटीला आलेल्या प्रत्येकाची ते आस्थेने विचारपूस करतात, हेच त्यांच्या मोठेपणाचे गमक आहे. बुधवार १४ मे रोजी त्यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांद्वारा त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला. अमरावतीकर हरखून गेले आहेत.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर न्या. भूषण गवई यांच्या रूपाने दुसऱ्यांदा अमरावतीचे नाव देशात गौरविले आहे. ते अमरावतीला आले की न्यायमूर्ती म्हणून ‘प्रोटोकॉल’ असताना तो बाजूला ठेवतात. कधीही बडेजाव नसतो.
सुलभा खोडके, आमदार
शालीनता, सुसंस्कार हे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या रूपाने आज देशाने बघितले आहे. ‘सर्वोच्च’ पदावर असतानाही शेवटच्या माणसाचा विचार हा त्यांच्या ठायी आहे. त्यांच्याकडे भेटीला आलेल्या प्रत्येकाची ते आस्थेने विचारपूस करतात, हेच त्यांच्या मोठेपणाचे गमक आहे. आई-वडिलांकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा न्या. भूषण गवई यांच्या कृतीतून प्रत्येकवेळी दिसून येतो. अमरावतीत त्यांचा वावर अनेकांना आपलेसे करतो.
रवी राणा, आमदार
न्या. भूषण गवई व त्यांच्या मातोश्री डॉ. कमलताई यांच्यातील ‘बॉडिंग’ अख्ख्या देशाने बघितले. न्या. गवई हे ज्या वकील संघाचे सदस्य आहेत, मीदेखील त्याचा सदस्य आहे. वकील म्हणून हा क्षण माझ्यासाठी ‘भूषण’च आहे. त्यांचा ‘अटॅचमेंट बॉण्ड’ हा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल.
अॅड. परवेज खान, अमरावती
न्यायमूर्ती गवई यांच्या रूपाने आज देशभरात अमरावतीचा गौरव झाला. न्या. गवई हे देशाच्या प्रतिष्ठेच्या ठिकाणी आरूढ झाले आहेत, ही समस्त अमरावतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या हातून नक्कीच देशसेवा घडणार आहे.
प्रवीण पोटे पाटील, माजी राज्यमंत्री)
सर्वोच्च पदावर असताना त्यांचे वागणे ‘डाऊन टू अर्थ’ आहे. सहा महिन्यांच्या कार्यकाळात ते न्याय यंत्रणेत निश्चितपणे वेगळी छाप उमटतविल, यात कुणालाही तिळमात्र शंका नाही.
अॅड. सुनिल देशमुख, अध्यक्ष, वकील संघ
दादासाहेब गवई यांचे सुपुत्र या नात्याने त्यांच्याकडून सर्वसमावेशक न्यायाची अपेक्षा आहे. आतापर्यंतचा त्यांचा कार्यकाळ देशाच्या हितासाठीच राहिलेला आहे. शांत आणि संयमी स्वभाव, अगदी नावाने हाक मारणे ही सर्वोच्च पदावर असताना त्यांची जमेची बाजी ठरली आहे. खऱ्या अर्थाने ते अमरावतीचे भूषण आहेत.
डॉ. सुनील देशमुख, माजी पालकमंत्री
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





