डोक्यात वीट मारून वृद्धाचा केला खून

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : जुन्या वैमनस्यातून ८० वर्षीय वृद्धाचा खून करण्यात आला. १२ मे रोजी रात्री १० च्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील नालवाडा येथे ती घटना घडली. याप्रकरणी १३ मे रोजी दुपारी खल्लार पोलिसांनी मृताच्या सुनेच्या तक्रारीवरून गावातीलच दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला तथा दहाही आरोपींना अटक केली. रामभाऊ भगवानजी झिपरकार (८०, रा. नालवाडा) असे मृताचे नाव आहे.

याप्रकरणी, खल्लार पोलिसांनी आरोपी संतोष शिवशंकर बोडखे, शिवानंद नारायणअप्पा बोडखे, महेश नारायणअप्पा बोडखे, सुरेश अप्पा बोडखे, मनोज शिवशंकर अप्पा बोडखे, सदाशिव शिवशंकरअप्पा बोडखे, आयुष शिवानंद अप्पा बोडखे, ओम महेशआप्पा बोडखे, दिलिप अप्पा बोडखे व प्रथमेश शिवअप्पा बोडखे (सर्व रा. नालवाडा) विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला तथा १३ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास सर्व आरोपींना अटक केली. खल्लारचे ठाणेदार रवींद्र बारड यांनी घटनास्थळी भेट दिली.

मृतक, आरोपी शेजारी मृतक रामभाऊ झिरपकार व आरोपी हे परस्परांचे शेजारी आहेत. आरोपींचा रामभाऊ यांच्यासोबत जागेचा जुना वाद आहे. त्या कारणावरून आरोपींनी १२ मे रोजी रात्री १२ वाजता वाद उपस्थित केला. त्यादरम्यान आरोपींनी वृद्धावस्थेतील रामभाऊ यांच्या डोक्यात वीट मारली. त्यामुळे ते खाली कोसळले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवाल व शवविच्छेदन अहवालानंतर खल्लार पोलिसांनी यात खुनाचा गुन्हा दाखल केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013538
error: Content is protected !!