अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हाधिकारी पंडा यांचे निर्देश, नागरीकांची जाणली मते

 

 

गडचिरोली : जिल्ह्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे तातडीने करता येणार्‍या अल्पकालीन व दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये नागरिकांच्या सूचना, अनुभव व मतांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले. तसेच  अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश सबंधित अधिकार्‍यांना दिले.

नियोजन भवन येथे जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अपघात नियंत्रणासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजनांची सखोल चर्चा करण्यात आली. आ. डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ यासारख्या गंभीर अपघातास  कारणीभूत ठरणार्‍या बाबींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले. जिल्हा नियोजन विकास निधीतून अपघात प्रवण स्थळांवर सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामांची माहिती विचारण्यात आली व आगामी आठवड्याभरात संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्त संस्थेमार्फत चौकशी केली जाणार आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचना आणि माहितीच्या आधारे प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करून उपाययोजना निश्चित करण्यात येतील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले.

आ. डॉ. मिलींद नरोटे यांनी देखील शहरातील काही भागात गती मर्यादा लागू करणे, ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कठोर कारवाई, पार्किंग सुविधा निर्माण करणे, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे, चामोर्शी येथील बस स्थानकाचे नियोजन, गडचिरोली आयटीआय व आष्टी येथील चौकांमध्ये वाहतूक सिग्नल लावणे तसेच एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जून महिन्यापासून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ व हेल्मेट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मोठ्या कंपन्यांकडून नेमण्यात आलेल्या खाजगी वाहनचालकांची नियमित तपासणी, वाहनचालकांनी मद्यसेवन न करता वाहन चालवत आहेत याची खात्री करणे, सीसीटीव्ही कॅमेरे व ट्राफिक सिग्नलची संख्या वाढवणे याबाबतही उपाययोजना राबविल्या जातील. जिल्ह्यातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली असली तरी अपघातांच्या प्रमाणात तितकासा वाढ झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरीकांनी मांडली रिंग रोडची मागणी

बैठकीत नागरिकांनी आपल्या अभिप्रायांतून अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.  शहरातील वाढती जड वाहतूक रोखण्यासाठी रिंग रोडची आवश्यकता, रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आणि शालेय वेळात शहरातील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद ठेवणे, मोठ्या इमारतींसाठी स्वतंत्र पार्किंगची सक्ती, रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविणे, वनक्षेत्रातील रस्त्यांवर वाहन चालकांना सावध राहण्याबाबत फलक लावणे, झाडांची छाटणी करणे, गतिरोधक बसवणे, दारू सेवन करून वाहन चालवणार्‍यांवर नियमित कारवाई करणे, बस स्थानकाजवळ यू-टर्न बंदी, महामार्गालगत ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करणे, दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती, रस्त्यावर भटक्या जनावरांची व्यवस्था, चामोर्शी येथील मुख्य रस्त्यावरील बस स्थानक समोर स्थलांतरित करणे, गडचिरोली-आरमोरी मार्गावरील खड्डे बुजवणे तसेच आरमोरी शहरात वाहनाची गती कमी करण्यासाठी गतिरोधकाचे काम करणारे रिव्हर्स ट्रिप लावण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!