सिरोंचा-आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूकीस मनाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सूचना

गडचिरोलीे  : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामामुळे निर्माण होणार्‍या धोक्याची दखल घेत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दोन प्रमुख मार्गांवरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-ण् वरील सिरोंचा ते आलापल्ली मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहने सुरु असून सदरील रस्ता पावसाळ्यात  जड वाहतुकीस पूर्णतः अयोग्य असल्याने हा मार्ग ५ जून च्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सिरोंचा ते आलापल्ली मार्गावरील जड वाहने मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली या पर्यायी मार्गाचा तसेच आलापल्लीहून मंचेरियालकडे जाण्यासाठी आष्टी–बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गाचा वापर करतील. मात्र, आपत्कालीन, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न-औषध, महावितरण, दूरसंचार, रस्ते दुरुस्ती व प्रवासी सेवा वाहनांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वरील कुरखेडा ते कोरची मार्गावर सती नदीवरील पूरबुडीत जुन्या पुलाजवळ  नव्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु असून वळण रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. मात्र पावसाळ्यात हा वळण मार्ग पाण्याखाली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिनांक ४ जून २०२५ मध्यरात्री पासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांसाठी कुरखेडा-आंधळी फाटा-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा आणि कुरखेडा-तळेगाव-खेडेगाव-अंतरगाव-पुराडा हे मार्ग वापरण्यात येतील, तर जड वाहनांसाठी कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!