चिखलदरा येथील देवी पॉईंटवर अतिक्रमण; लीज संपूनही जागेवर कब्जा कायम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) चिखलदरा : येथील प्रसिद्ध देवी मंदिर परिसरात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. विशेषतः देवी पॉईंट परिसरात काही झुलेवाल्यांनी सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय सुरू केला असताना, आता त्यांनी पक्के अतिक्रमण करीत हजारो चौरस फूट जागा बळकावण्याची तयारी केली आहे. या सर्व प्रकाराला पालिकेतील काही अधिकाऱ्यांचे डोळेझाक स्वरूपाचे समर्थन मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवी पॉईटजवळील मोकळ्या जागेचा काही भाग झुलेवाल्यांना एक वर्षासाठी लिजवर देण्यात आला होता. हा लीज करार तत्कालीन वादग्रस्त मुख्याधिकारी व प्रशासक सुधाकर पानझाडे यांनी केला होता. या करारनाम्यामध्ये जागेचे मोजमाप नमूद नसल्यामुळे लिजधारकाने मनमानी करीत हजारो चौरस फूट जागेवर बेकायदेशीररीत्या कब्जा केला आहे. विशेष म्हणजे लिजची मुदत संपून सात महिने झाले असताना देखील, संबंधित व्यापारी कोणतेही भाडे न भरता व्यवसाय सुरू ठेवून प्रशासनाची फसवणूक करत आहे.

लीज संपल्याची माहिती नव्हती. काही दिवसांपूर्वी त्याच लिजधारकाकडून अधिक जागा लिजवर मागण्यासाठी अर्ज प्राप्त झाला आहे, ज्यावर अद्याप निर्णय घेणे बाकी आहे. मात्र परवानगीशिवाय अतिक्रमण केल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल.
-सुधीर धावडे , प्रभारी मुख्याधिकारी

…तर पालिकेसमोर आत्मदहन
-पालिकेने नियमांचा फज्जा उडवून संबंधित झुलेवाल्याला ही जागा दिल्यामुळे, या जागेवर छोटे व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांना उपासमारीची वेळ आली आहे. आमची मागणी आहे की, नियमांनुसार सर्व स्थानिकांना या जागेवर व्यवसाय करण्याची संधी मिळावी आणि सर्वांना समान हक्क मिळावा. जर लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागला नाही, तर आम्ही संघटित स्वरूपात पालिकेसमोर आत्मदहन करू.
-प्रवीण धुर्वे,मेलघाट योद्धा संघटना

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!