दिव्यांग नवदांपत्यांचा आदर्श नेत्रदीपक विवाह संपन्न; अंजनगाव सुर्जी येथील पत्रकार बांधव व महसूल विभागाचे कर्मचारी बनले वऱ्हाडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : येथील प्रभा मंगलम येथे दिव्यांग नवदांपत्याचा आदर्श नेत्रदीपक विवाह पत्रकार बांधवांच्या पुढाकाराने व महसूल विभागाच्या व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात सहकार्याने संपन्न झाला. यावेळी नवदामपत्यांचा आई म्हणून अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार श्रीमती पुष्पा सोळंके यांनी मान पटकाविला. भारताचे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांची आई , माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई हे कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण ठरलेल्या विषेश अतिथी म्हणून उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून दर्यापूर मतदार संघाचे आमदार गजानन लवटे, माजी आमदार रमेश बुंदिले, विभागीय पोलीस अधिकारी गायकवाड साहेब, अंजनगावचे ठाणेदार अहिरे साहेब ,नायब तहसीलदार श्री काळे,श्री.भगत साहेब,प्रेमकुमार बोके,सिमा बोके ,रमेश सावळे,तसेच जिजाऊ बिग्रेडच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग कुटुंबांचा हा लग्न सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा नेत्रदीपक विवाह लग्न सोहळा हा आकर्षण बनला होता.वर दारापूर येथील निवृत्ती प्रभाकर वानखडे हे होते तर वधू शेंडगाव येथील संगीता सोळंके ह्या होत्या. लग्न सोहळ्याच्या पूर्वी जिजाऊ वदनेने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मंगलाष्टक म्हणून लग्न समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रविण पेटकर यांनी नवदिव्यांग दांपत्यांना संसार उपयोगी भांडी दिले.तर हरिश खत्री यांनी दिव्यांग नवदामपत्यांचा विवाहासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल डालके यांनी केले तर आभार प्रवीण कुमार बोके यांनी केले. या कार्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून प्रविण बोके,अशोक पिंजरकर ,मनोहर मुरकुटे , वासुदेवराव काळपांडे ,जयेंद्र गाडगे ,सचिन अब्रूक, मनोज मेळे, पंकज हिरूळकर, सचिन इंगळे,सुधाकर टिपरे ,कुशल चौधरी,हाजी अब्दुल रहेमान भाई, संघरत्न सरदार ,महेंद्र भगत,गिरीश लोकरे, सह पत्रकार मंडळी यांनी अनमोल विशेष सहकार्य केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!