ऑपरेशनल अडचणीमुळे मुंबई-अमरावती विमान रद्द २० दिवसांत दुसऱ्यांदा गैरसोय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती प्रतिनिधी ऑपरेशनल अडचणीमुळे मुंबई-अमरावती, अमरावती-मुंबई विमान फेरी शुक्रवार, १३ जूनला अलायन्स एअरने रद्द केल्याची माहिती अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरील ऑपरेशनल मॅनेजरने दिली. मागील २० दिवसांत रद्द झालेली ही दुसरी विमान फेरी होय. मुंबईहून विमान अमरावतीत २६ मे रोजी लैंड झाल्यानंतर विमानात इंधन भरणारे टैंक घेऊन येणारे ट्रॅक्टर चिखलात फसल्यामुळे ते ७२ आसनी विमानापर्यंत पोहोचू शकले नाही व सायंकाळ झाल्याने त्या दिवशी विमानोड्डाण झाले नाही. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रात्री विमानोड्डाणाची अद्याप सोय झाली नाही. त्यामुळे हे विमान दुसऱ्या दिवशी मंगळवारी मुंबईकडे रवाना झाले होते. त्यामुळे विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला होता.

 

अमरावतीहून रात्री विमानोड्डाणाची सोय होण्यास आणखी ४ ते ५ महिन्यांचा कालावधी आहे. अद्याप ती यंत्रणाच विमानतळावर उभारण्यात आली नाही. परिणामी प्रकाशातच विमानोड्डाण करावे लागते.

 

 

ऑपरेशनल अडचणीमुळे मुंबईहून विमानाने उड्डाणच केले नाही. त्यामुळे अलायन्स एअरने मुंबई-अमरावती, अमरावती-मुंबई ही शुक्रवार, १३ जूनची विमान फेरी रद्द केली.

राजकुमार पटेल, ऑपरेशनल मैनेजर, अलायन्स एअर, अमरावती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!