सोहम नेसनेसकरची योगा स्पर्धेत सातासमुद्रापार भरारी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) येथील ओम इंटरनॅशनल स्कुलचा सोहम मोहन नेसनेसकर याने कनार्टक मध्ये पार पडलेल्या नॅशनल योगा स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून व्हिएतनाम येथे आठ ते चौदा या वयोगटाच्या स्पर्धेत सोहमने नेपाळ ,मलेशिया व व्हिएतनाम या देशाच्या स्पर्धकाना मात देत पहीला नंबर पटकावुन गोल्ड मेडल आणि शिल्ड मिळवून महाराष्ट नव्हे तर भारताचे नाव उंच केले आहे. त्यामुळे सोहमचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.त्यानिमीत्त त्याच्या अंजनगाव सुर्जी येथील निवास्थानी सोहमला भरभरुण शुभेच्छा देण्याकरीता भाजपा शहराध्यक्ष मनिष मेण, शहराचे माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे ,जिल्हा महामंत्री डॉ विलास कविटकर , गजानन लेंधे , राजेंद्र रेखाते , विनोद दुर्गे गुरुजी ,आशिष टिपरे ,देवानंद टांक ,प्रविन पटुकले , देवेंद्र नेमाडे ,सौरभ जुनघरे ,सोशल मीडीया शहर प्रमुख निलेश पाटील बारी यांच्या उपस्थिती मध्ये सर्वानी सोहमला भरभरुन शुभेच्छा दिल्या.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!