चांदूर बाजार : तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघाकडून नाफेड अंतर्गत ज्वारी खरेदीला आ. प्रवीण तायडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रामदास शेळके, खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांसह संचालक उपस्थित होते. चांदूर बाजार येथे सुरू झालेल्या नाफेड ज्वारी खरेदीच्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने ज्वारी विक्रीची संधी उपलब्ध झाली असून, शासनाच्या या उपक्रमाचा लाभअनेक शेतकरी घेत आहेत. शुभारंभाला पहिल्या दोन शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रमेश तायवाडे, शहराध्यक्ष आनंद अहिर, हर्षल धुळे, राजू डवरे, सरपंच अजिंक्य चुनडे, अतुल दारोकार, नंदू मडघे, सोनू कांडलकर, शुभम किटुकले, अनिकेत वाट, राम विधाते, स्वप्नील नवलकर, राहुल नवलकर, विठ्ठल हुशंगाबादे, नीलेश वैराळे, गजानन खापरे, गोपाल वासनकर, नीलेश देशमुख, मनीष नांगलिया, अभिजीत घोरमाडे, सत्यजीत ठाकरे यांच्यासह कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





