अमरावती:शासकीय कार्यक्रमात आमदाराला डावलले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दर्यापूर : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार गजानन लवटे यांचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी उद्धवसेना प्रणीत युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, स्थानिक आमदारांचे नाव वगळून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजकांनी राजशिष्टाचाराची पायमल्ली केली आहे. याप्रकरणी प्राचार्याची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. युवासेना दर्यापूर तालुका प्रमुख सागर गिन्हे, शहरप्रमुख रूपेश मोरे, मोहन खरबळकार, संजय कोरडे, शरद आठवले, विजय डवंगे, वेदांत साखरे तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013535
error: Content is protected !!