अमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवांनी एका शेतकऱ्याला मोबाइलवरून जिवे मारण्यासह कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणी वलगाव पोलिसात १९ जून रोजी एनसीआर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक केशव विजयकर असे आरोपीचे नाव आहे.
एफआयआरनुसार गणेश कडू हे १९ जून रोजी नया अकोला येथील शेतामध्ये असताना दुपारी १२.३५ वाजता दीपक विजयकर यांच्या मोबाइल नंबरहून त्यांना ३० ते ४० कॉल आले. कडू यांनी कॉल उचलले, तेव्हा बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी माझ्या तक्रारी तूच करून राहिला, अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारून टाकीन व तुझ्या संपूर्ण कुटुंबाला मिटवण्याची धमकी दिली. यावर गणेश कडूने तत्काळ वलगाव पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला. गणेश कडू हे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापतीसुद्धा होते. ते बाजार समितीचे दीर्घकाळ संचालक होते. बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी गणेश कडू यांना जिवे मारण्याची धमकी का दिली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





