रिलेशनशिपचा आग्रह : तरुणीसह तिच्या वडिलांना मारण्याची धमकी
अमरावती : तिवसा येथील एका २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग व धमकी देणे तेथील एका तरुणाला चांगलेच भोवले. गुन्हा दाखल करताच पोलिसांनी त्याला अटक केली, तर न्यायालयाने त्याची रवानगी थेट कारागृहात केली. अनिरुद्ध झटाले (२५, तिवसा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तिवसा पोलिसांनी २१ जून रोजी सकाळी विनयभंग व धमकीचा गुन्हा दाखल केला तथा दुपारी १.१८ च्या सुमारास त्याला अटक करून लगेचच न्यायालयासमक्ष उपस्थित केले.
एफआयआरनुसार, फिर्यादी व आरोपीची दोन वर्षापूर्वी ओळख झाली. त्यांचे फोनवर बोलणे होत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीस आपण लग्न करू, अशी बतावणी केली. मात्र आपण तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे बजावत तरुणीने आरोपीसोबत बोलणे तुझ्या वडिलांना सोडणार नाही १६ जून रोजी सकाळी आरोपीने तिचा पाठलाग केला. माझ्यासोबत बोलणे का बंद केले? मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्यासोबत संबंध ठेव, असा आग्रह धरला. त्यावर मला तुझ्याशी बोलायचे नाही. तू येथून निघून जा, असे तरुणीने म्हटले असता, आरोपीने शिवीगाळ करून मी तुला सोडणार नाही, तुझे वडील आपल्या मधात आले तर त्यांनाही मारेन, अशी धमकी दिली.
बंद केले. तेव्हापासून आरोपी हा तिला वारंवार वेगवेगळ्या मोबाइलहून फोन करून तू माझ्यासोबत संबंध ठेव, नाही तर तुला मारून टाकेन, अशा धमक्या देत होता. त्यामुळे ती प्रचंड त्रस्त झाली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





