स्थानिक निवडणुकीत युवांचा कौल निर्णायक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू आहे. दीड महिन्यात महापालिकेसह नगर परिषदांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीपश्चात जिल्ह्यात सध्या ४३,७६९ मतदार वाढले आहेत व यामध्ये २९,३६६ मतदार युवा आहेत. शिवाय मतदारांमध्येही सर्वाधिक युवकांचाच बोलबाला आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना, आरक्षण व मतदार यादीचा कार्यक्रम महत्त्वाचा असतो व ही निवडणुकीची पूर्वतयारी असते. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान २९ ऑक्टोबर २०२४ रोजी २५,४६,४५८ मतदार संख्या होती तर २० जून २०२५ रोजी २५,९०,२२७ मतदार आहेत. जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू आहे. यानंतर आरक्षण सोडत व मतदार यादीचा कार्यक्रम लागेल व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याच्या दरम्यान निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

युवांमध्ये वाढ, ज्येष्ठांमध्ये कमी विधानसभा निवडणुकीनंतर १८ ते १९ वयोगटात ७४०४, २० ते २९ वयोगटात २१९६२, ३० ते ३९ वयोगटात ७८८४, ४० ते ४९ वयोगटात ३५३६, ५० ते ५९ मध्ये २१०५, ६० ते ६९ मध्ये १०१३ व ७० ते ७९ वयोगटात ३६७ मतदार वाढले आहेत. याशिवाय ८० ते ८९ वयोगटात ३२५ व २० ते ९९ वयोगटात १५० मतदार कमी झाले आहेत.

२० ते ५० वयोगटात सर्वाधिक मतदार सध्या १८ ते १९ वयोगटात ५४,३२४ मतदार, २० ते २९ मध्ये ५,०५,७१४ मतदार, ३० ते ३९ गटात ५,७२,९०५ मतदार, ४० ते ४९ गटात ५,२९,५६५ मतदार, ५० ते ५९ गटात ४,३८,९५८ मतदार, ६० ते ६९ गटात २,६६,९९२ मतदार, ७० ते ७९ गटात १,४५,३३६, ८० ते ८९ गटात ६१,८६६ तर २० ते २९ गटात १३२५१ व १०० पार ११ मतदार आहेत.

 

सद्यस्थितीत मतदार संख्या

 

मतदारसंघ  मतदार

धामणगाव :३२०२११

बडनेरा : ३७२७१२

अमरावती : ३८२९१७

तिवसा : ३००७८१

दर्यापूर : ३०९४६६

मेळघाट : ३०९४६६

अचलपूर : २९६६८८

मोर्शी : २९५६६७

एकूण : २५९०२२७

 

 

 

 

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013533
error: Content is protected !!