अमरावती : धारणी तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर शारीरिक बळजबरी करण्यात आली. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. २६ जून रोजी हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी सुखलाल कुंजीलाल जावरकर (२८, ता. चिखलदरा) याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.
२५ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आई-वडिलांच्या गैरहजेरीत पळवून नेले. तथा तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. वैद्यकीय तपासणीतून ती बाब उघड झाली. त्यामुळे बाल संरक्षण कक्षाने धारणी पोलिसांच्या मदतीने तिचे बयाण नोंदविले. त्यावेळी आरोपीने बलात्कार करून तिच्यावर गर्भारपण लादल्याचे उघड झाले. आरोपी सुखलाल याला २६ जून रोजी पहाटे १:३५ च्या सुमारास अटक करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 72





