
अमरावती: नागपूरवरून अमरावतीकडे जात असलेल्या पिकअप व्हॅनमध्ये अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तिवसा पोलिसांना मिळाली. त्या आधारावर तिवसा पोलिसांनी अवैध गोवंश वाहून नेणाऱ्या एमएच ४० – ९३४० क्रमांकाच्या वाहनाला रोखले. त्यामधून एक लाख ३३ हजार रुपये किमतीच्या १५ गोवंशाची सुटका केली. याशिवाय चार लाख किमतीचे वाहन असा ५ लाख ३३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.. महामार्गावरील शेंदोळा खुर्द येथेशनिवारी मध्यरात्रीनंतर १२:३० वाजता ही कारवाई केली. सुटका केलेल्या गोवंशाची नांदगाव पेठ येथील गोरक्षणात रवानगी केली. याप्रकरणी तिवसा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली असून, वाहनचालक पसार झाला आहे. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक भारत देशकरी व पोलिस शिपाई मोईन यांनी केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






