कुरिअर बॉय असल्याचं सांगत फ्लॅटमध्ये शिरून तरुणीवर बलात्कार, मोबाईलमध्ये सेल्फी काढून दिली धमकी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे शहरातील कोंढवा भागातील एका गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता पीडितेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. गुन्हेगाराचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

 

पुणे- राज्याची सांस्कृतिक राजधानी पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेनं हादरली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचं भासवून नराधमानं २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोंढवा येथं घडली आहे. आरोपीनं कुरियर डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगत अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.

पुणे शहरातील कोंढवा भागातील एका गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी संध्याकाळी पीडितेवर अत्याचार झाल्याची घटना घडली. पीडिता एका कंपनीत काम करते. ती अपार्टमध्ये एकटी असताना कुरिअर डिलिव्हरी एजंट असल्याचं भासवून आरोपीनं तिच्या घरात प्रवेश मिळविला. कुरिअर दिल्यानंतर कागदपत्रावर सही करण्यासाठी त्यानं पीडितेकडं पेन मागितला. पीडिता मागे वळताच तो अचानक घरात आला. त्यानंतर आरोपीनं दार बंद करून गुन्हा केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली.

 

  • आरोपीनं पीडितेच्या फोनवर सेल्फीदेखील काढला. तिचे फोटो काढले आहेत. कोणालाही घटनेची माहिती देऊ नये. अन्यथा सोशल मीडियावर ते फोटो शेअर करणार असल्याची आरोपीनं फोनवरील मेसेजमध्ये धमकी दिली आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त (झोन ५) राजकुमार शिंदे यांनी सांगितलं.

आरोपीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद- रात्री ८.३० च्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर तरुणीला काहीही आठवलं नाही. त्यानंतर तरुणीनं घडलेल्या घटनेची माहिती नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली.आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी गुंगी आणणारा पदार्थ वापरला असण्याची शक्यता आहे. आरोपीनं पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी काही स्प्रे वापरला आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. आरोपीचा चेहरा परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्याचा शोध घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यानं सांगितलं.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013524
error: Content is protected !!