भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

पुणे : मतदान केंद्रात कशा पध्दतीने मतदान प्रक्रिया पार पडते? याबद्दल अनेक जण अनभिज्ञ होते. मात्र, पहिल्यांदा मतदानाला आल्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसून आले. राजकारणाबाबत तरूणाई सजग झाली आहे. कोण कोणते उमेदवार बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत ? त्यांची वैयक्तीक, कौटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी आहे ? सध्याचे राजकीय समीकरणे काय आहेत ? या सर्व बाबींचा अभ्यास करून ते सजगतेने आत्मविश्वासाने मतदान करताना दिसून आले.

महापालिका निवडणूका दोन वर्षापासून रखडल्यामुळे अठरा वर्षे पूर्ण होऊनही अनेक तरूणांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोकसभा निवडणूकीपर्यंत वाट पहावी लागली. त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणाईची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले.

भर उन्हात सळसळत्या पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे. पहिल्यांदा मतदान करणार असल्याने उत्सुकता होती. खूप आनंद वाटला यापुढील निवडणुकांमध्येही मतदान करणार आहे. – योगेश काळुराम जानकर, वय २१”

मतदान केंद्राच्या आतमध्ये कशाप्रकारे कार्य चालते हे पहिल्यांदा अनुभवले. कोणते उमेदवार उभा आहेत याची माहिती घेतली तसेच कुटुंबियांशी चर्चा केली होती. कोण आमच्या भागातील प्रश्न सोडवू शकतो? विकास कामे करेल याचा विचार करून घरातून निघतानाच कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे ठरवून आले होते. – ऐश्वर्या बाळासाहेब शेलार, वय २५’

” माझ्या बालपणाची शाळा असल्याने मतदान करताना कोणतेही दडपण जाणवले नाही. नगरपालिका निवडणुका लांबल्याने माझे मतदार यादीत नाव नोंदवून पहिल्यांदा मतदानासाठी अनेक वर्षे वाट पहावी लागली. – निखिल सुभाष कामठे, वय २५

“बारामती मतदारसंघात कोण- कोण उमदेवार उभा आहेत. त्यांनी पूर्वी काय काम केले आहे ? भविष्यात शहराच्या आणि राज्याच्या विकासासाठी ते योगदान देउ शकतात का? याचा विचार केला. आज पहिल्यांदाच मतदान केल्याचा खूप आनंद वाटतोय. आदिती कुणकेकर, वय २२’

मी पहिल्यांदा मतदान केले. मतदान केंद्रात येण्यापूर्वी सर्व उमेदवारांबद्दल माहिती घेतली होती आणि अगदी सहजपणे मतदानही केलं. खूप चांगले वाटत आहे. – फाहेदा शाहरूख शेख वय- १९’

‘कुटुंबियांनी विशेष करून माझ्या आईने मी मतदान करावे यासाठी मला प्रोत्साहित केले. समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा चांगला उमेदवार निवडून आला पाहिजे. देशात लोकशाही टिकण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरूण वर्गाने पुढेआले पाहिजे. – आदिती अशोक गोसावी वय- १९’

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!