मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या सामना रंगत असून या लढतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचारकाळात पवार कुटुंबात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोपही करण्यात आले. मात्र आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांचे घर गाठत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांची भेट घेतली. ऐन मतदानाच्या दिवशी सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची भेट का घेतली, यावरून मतदारसंघात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.बारामती लोकसभा मतदारसंघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर यंदा सुनेत्रा पवार यांच्या रुपाने तुल्यबळ उमेदवार मैदानात आहे. त्यामुळे सुळे यांना खडतर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘इमोशनल कार्ड’ वापरून प्रचाराची सुरुवात करणाऱ्या सुप्रियाताईंच्या प्रचाराची सांगताही भावनिकच झाली होती. दुसरीकडे, अजित पवार यांनी यापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका घेत, विकासाच्या मुद्द्यावर भर दिला होता.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही या भेटीवर निशाणा साधला आहे. या भेटीच्या निमित्ताने मतदारसंघात भावनिक वातावरण निर्माण करण्याची ही राजकीय खेळी खेळल्याचा आरोप सुळे यांच्यावर केला आहे.

दरम्यान, या भेटीवर स्पष्टीकरण देत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, “माझे बालपण काकींकडेच गेले आहे. माझ्या आईने जेवढे केले नसेल तेवढे काकींनी केलं आहे. त्यांच्या हातचे चपातीचे लाडू खूप छान असतात. हे माझ्या काका-काकींचे घर आहे. आम्ही फिरत फिरत नेहमीच येत असतो. आशाकाकू आवर्जून मतदानाला आल्या म्हणून त्यांना भेटायला आले होते,” असं सुळे यांनी म्हटलं आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!