
बडनेरा : नव्या वस्तीच्या आठवडी बाजार परिसरात सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस पथकाने मंगळवारी छापा टाकून २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.
रिज्जू कुरेशी, आशिष वाडीभस्मे, राहुल वरठे, अमित वानखडे, अभिषेक सरडे असे कारवाईत पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली. बडनेरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 35






