पारा ४३ अंश पार; रस्ते सामसूम, घरात घामाघूम !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : गत काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. त्यात थोड्याफार पावसामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून,उष्णतेपासून सुटका करून घेण्यासाठी लोक कुलर खरेदीकडे वळले आहेत. सध्या एसी, कुलरला चांगली मागणी वाढली आहे. तडाख्याचे उन्हामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले असतानाच रविवारचे तापमान ४३.६ अंश सेल्सिअस, इतके नोंदवले गेले आहे. परिणामी दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यावर लॉकडाऊन सारखी स्थिती दिसून येत आहे. ढगाळ हवामानामुळे हवेत कमालीचा उकाडा जाणवत आहे. तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे सरकला असून, उकाड्याने नागरिक, पशुधन, प्राणी, पक्षी है हैराण झाले आहेत.

सध्या उष्णतेची लाट असून, त्यात वाढ होण्याची शकता असल्याने उष्माघात होऊ शकतो. थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्यावे. पाणीयुक्त फळांचे जसे की, टरबूज, कलिंगड, खरबूज, नारळ पाणी, संत्री, मोसंबी सेवन करावे, फ्रीज मधील थंड पाणी पिणे टाळावे. त्याऐवजी माठातील पाणी प्यावे.

– डॉ. सुभाष ढोले, अतिरिक्त डीएचओ

प्रशासनाकडून ५९ उष्माघात केंद्र सुरु जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामु‌ळे उष्माघातावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

उष्माघात होण्याची कारणे अन् लक्षणे उन्हात शारीरिक श्रमाची, अंगमेहनतीची व कष्टाची कामे. बॉयलर रूम, काच कारखान्यात, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम यामुळे उष्माघात होऊ शकतो. मळमळ, उलटी, हाता-पायाला गोळे, थकवा, ताप, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे, क्चचित लाल होणे, चक्कर येणे, निरुत्साह आदी लक्षणे आहेत.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!