भटवाडीत भरदिवसा ६.३५ लाखांची घरफोडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : भटवाडी येथील रहिवासी एका महिलेचे घर फोडून ६ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना ६ मे रोजी दुपारी घडली.भटवाडी येथील रहिवासी महिला या सोमवारी सकाळी १०.३० वाजता घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या. त्यावेळी त्यांना गेटचे लॉक उघडलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने घरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना घरातील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी लाकडी अलमारीची पाहणी केली. त्यावेळी अलमारीतील ४० ग्रॅम, १५ ग्रॅम व १८ ग्रॅम सोन्याचे ३ मंगळसूत्र, २२ ग्रॅमचा नेकलेस, ४ ग्रॅमची अंगठी, प्रत्येकी ४ ग्रॅमचे कानातील ३ जोड, २ ग्रॅमचे कानातील टॉप, ५ ग्रॅमची अंगठी व १ लाख रुपये रोख असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!