
कधीच न आटणारी तहसीलमधील ब्रिटिशकालीन विहीर
अमरावती : शहरातील तहसील कार्यालयातील ब्रिटिशकालीन विहीर हि दररोज हजारोंची तहान भागवण्यासोबतच अनेकांचे पोट भरण्याचीही जवाबदारी शेकडो वर्षांपासून चोख निभावत आहे. कधीच न आटणारी विहीर हि ओळख कमावलेल्या या विहिरीचे पाणी तीन चाकी सायकल रिक्षाने दुकाना-दुकानांत वाटण्याचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांसाठी हि विहीर वरदान ठरली आहे.
तूर्त सांस्कृतिक भवन समोरील भव्य इमारतीत स्थानांतरित होत असलेले मूळ अमरावती तहसील कार्यालय हे आजवर श्याम चौक परिसरातील ब्रिटिशकालीन इमारतीत होते. त्या इमारत आवारात एक भली मोठी विहीरही आहे. परिसरातील शेकडो दुकानात याच विहिरीचे पाणी जाते. कित्येक कटला चालक या विहिरीचे पाणी शेकडो दुकानांत पोहचवतात. दिवसभर या विहिरीतील पाण्याचा उपसा सुरु राहूनही आणि जिल्ह्यात कितीही मोठा दुष्काळ पडूनही या विहिरीचे पाणि तूटल्याचे आजवर कुणी बघितलेले नाही. या विहिरीचे पाणी भरण्यासाठी दिवसभर चांगलीच गर्दी असते. हे पाणी अनेकांसाठी रोजगाराचे साधन झाले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






